Posts

खगोलशास्त्र/खगोलभौतिकी विषयात करिअर!!

Image
  जवळ १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन क्षेत्रात असलेल्या भागीदारीचा टक्का प्रत्यक्षरित्या निराशाजनक आहे. ट्रेडींग इकॅानोमिक्स या वर्ल्ड बॅंकेच्या २०१८ च्या सर्वेक्षणानुसार भारत देश हा आपल्या एकूण राष्ट्रीय दरडोई उत्पन्नापैकी ०.५४९ टक्के इतकीच गुंतवणूक वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनात करतो, ही आकडेवारी गेल्या दशकातील सर्वात निम्नतम आहे, असे या सर्वेक्षणात म्हटलेले आहे, पण जागतिक पातळीवर संशोधनात विशेषत: मूलभूत विज्ञान संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय भागीदारी ही काळानूसार वाढत असल्यामुळे भारतासारख्या विकसनशील आणि तरुण देशात संशोधन वृत्ती येत्या काळात वाढणार आहे हे नक्की! मूलभूत विज्ञानात संशोधन हा प्रकार आपल्या देशाच्या आधुनिक इतिहासात नवीन नाही. नोबेल पारितोषिक विजेत्यांची आपल्या देशात वानवा असली तरी सर सी.व्ही रामन, सुब्रमण्यम चंद्रशेखर, मेघनाथ साहा, सत्येंद्रनाथ बोस, वेंकटरमन रामकृष्णन यांसारख्या विभूतींनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रांत अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मूलभूत विज्ञान क्षेत्रात करीअर करणा-या भरपूर संधी या २१ व...

धातुरुपी पाणी - विश्वातील सर्वात मुबलक असणारी पाण्याची पाचवी अवस्था

Image
घन बर्फ, द्रवरुप पाणी, वाफ आणि प्लाझ्मा ह्या पाण्याच्या सर्वसाधारण अवस्था मानल्या जातात. कोणत्याही पदार्थाला बाह्य साधनाने उष्णता दिली की त्यांतील रेणूंमध्ये असणारे सहसंयूज बंध हे शिथिल होऊन पदार्थ प्रसरण पावतो व त्याचे द्रवात, आणखी उष्णता दिली की वायूत (वाफ) आणि एका विशिष्ट तापमानाच्या पुढे त्याला उष्णता दिली की त्या पदार्थाच्या अणूतील इलेक्ट्रॅान वेगळे होऊन त्याचे प्लाझ्मात रुपांतर होते.या प्लाझ्मात पदार्थांच्या अणूंमधील इलेक्ट्र्रॅान, प्रोटॅान आणि न्युट्र्रॅान या कणांची यादृश्चिक गतीने हालचाल चालू असते. पण या सर्व अवस्थांनंतर शास्त्रज्ञांनी पाण्याची एक नवीन विचित्र अवस्था शोधून काढली आहे. ही विचित्र अवस्था घनरुप बर्फाच्या आधीची अवस्था नाही, तर ती प्लाझ्माच्या नंतरची अवस्था आहे. सध्याच्या चालू वर्षात अमेरिकेतील ब्रिकटोन येथील लेझर एनर्जेटीक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी एक अभिनव प्रयोग केला. या प्रयोगात एका पाण्याच्या लहान थेंबावर जगातील एका शक्तीशाली लेझर किरणाच्या शलाकेने मारा केला गेला. लेझर किरण हे एक विशिष्ट प्रकारचे कृत्रिम प्रकाशकिरण असतात, या किरणांची शक्ती इतकी भेदक असते की...

२०२० वर्षातील भौतिकशास्त्राची नोबेल गाथा

Image
       तब्बल १०० वर्षांहुनही जास्त काळाआधी आइनस्टाइनप्रणित सापेक्षता सिद्धांताने आधुनिक भौतिकशास्त्र जगतात खळबळ उडवून दिली होती. गुरुत्वाकर्षण बलाविषयीची मानवाची हजारो वर्षांपूर्वीची धारणा मूलभूत सापेक्षता सिद्धांताने बदलली. या सिद्धांताच्या व्याप्तीत आइन्स्टाईन यांच्याबरोबर कित्येक सैद्धांतिक तसेच प्रायोगिक भौतिक शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा समावेश होता. यंदाचे २०२० सालाचे भौतिकशास्त्राचे नोबेल याच सापेक्षतेशी निगडीत आहे. विज्ञान आणि विशेषकरुन भौतिकशास्त्राची किरकोळ जाण असलेल्या व्यक्तीसाठी गुरुत्वाकर्षण बल म्हणजे आपल्या स्वत:ला पृथ्वीवर, चंद्राला पृथ्वीभोवती आणि पृथ्वीला सूर्याभोवती धरुन ठेवण्याचे बल! पण हे बल कशामूळे निर्माण होते, या बलाच्या क्षेत्रात दोन परस्परांना आकर्षित करणा-या वस्तूंमध्ये असे नेमके काय घडते की ज्याच्यामुळे त्या दोन वस्तू आकर्षिल्या जातात, अशी कोणती अदृश्य शक्ती आहे ज्यामुळे हे आकर्षण निर्माण होते, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मूलभूत सापेक्षतेच्या आधीच्या कोणत्याही शास्त्रीय सिद्धाताकडे नव्हती. पण मूलभूत सापेक्षतेने या सा-या प्रश्नांचे समाधानक...

विश्वातील वैशिष्ट्यपूर्ण तारे

Image
    ‘​यु.व्हाय स्कुटाय’ – आकाशगंगेतील मोजक्या महाराक्षसी तार्यांपैकी एक!!        अमेरिकेतील न्यूयॅार्क विद्यापीठातील रुदरफोर्ड वेधशाळेने सन २०११ रोजी टिपलेले ‘यु.हाय स्कुटाय’ तार्याचे अवरक्त (Infrared) पटलातील छायाचित्र. दाट तार्यांच्या गर्दीत यु.व्हाय स्कुटाय  हा तारा तांबड्या रंगाचा सर्वात तेजस्वी तारा दिसतो.              आपल्या आकाशगंगेतील तार्यांचे खरे रुप व त्यांचा आकार याविषयी खगोल अभ्यासकांत तसेच सामान्य व्यक्तींमध्ये सुद्धा कुतुहल असते. पण यु.व्हाय स्कुटाय सारख्या तार्यांची वैशिष्ट्यपूर्ण तथ्ये कित्येक अभ्यासकांना त्यांच्या ह्रद्यात धडकी भरायला लावू शकतात. अंधार्या रात्री आकाशात दिसणार्या तार्यांनी पुरातन काळापासून मानवाला भूरळ घातली आहे आणि त्यांच्यात कुतुहलाचे रोपण केले आहे. पुढे दूरदर्शक व तसेच वेधशाळांच्या निर्मितीने आकाशात साध्या डोळ्यांनी न दिसणार्या सुद्धा तार्यांचा वेध घ्यायला सुरवात झाली होती. निरिक्षणांती प्रत्येक तार्यांची वैशिष्ट्ये ही भिन्न होती, असे लक...